पुस्तकात
दुमडुन ठेवलय आठवणींच एक पान
शब्द खुप सुंदर होते लिहलेले होते खुप छान,
शब्दांमध्ये होता गोड गुलाबी थंडीचा गारवा
खळखळत होते झरे बहरत होता निसर्ग हिरवा,
चिमण्यांची होती चिवचिव
कावळ्यांची कावकाव,
पोपट करत मिठूमिठू
नुकताच लागलेला होता श्रावण ऋतू,
मोर पिसारा फुलवून
नाचत होता
कोकिळा मंजूळपणे गात होती,
चिखलात कमळ उमलत होते
कस्तुरी सुगंध दरवळत होता ,
वाऱ्याची मंद झुळूक मनाला छेडत होती
बरसणारे मोती
पापण्यांवर दाटत होते ,
लहान मुलं कागदाच्या होड्या बनवत होती
मोठी मोटारगाड्या
फिरवत होती ,
शिवारात पिके डोलत होती
अगोदर तीही थेंबापायी आसुसली होती
कुणब्या खुश होता उसाला चांगला भाव होता ,
कोवळ्या उन्हाच्या सारी पडत होत्या
डोंगरच्या मध्यस्ती इंद्रधनु रंग उधळित होता ,
डोंगरच्या मध्यस्ती इंद्रधनु रंग उधळित होता ,
हे कोवळे उन चौफेरी पडत होते
आणि दुमडून ठेवलेले आठवानींचे पान सरत होते
© दिपक रा.पाटील.
No comments:
Post a Comment