Tuesday, 12 December 2017

दिसला रानात...


दिसला  रानात  काळा  पक्षी
अंगावरती  पांढरी  नक्षी
त्याचे  डोळे  टपोरे  गोल
जाड  पापण्या भुवया खोल

दिसलं  रानात  काळं  फुल
लागली  कुतूहलाची  चाहूल
बघितले  नव्हते  कधी  असे
जणू  मज ते  एकमेव भासे

दिसला  रानात  काळा साप
अंगी  भरला  भितीची ताप
घेतली  जाड  काठी हाती
हाणली त्याच्या  कमरेवरती

दिसली रानात काळी माशी
क्षणभर वाटली जणू मधमाशी
बसली हाती पण चावली नाही
तेव्हा कळलं ती मधमाशी नाही

© दिपक  पाटील

No comments: