डालीडालीवर बसणारं
पानाफुलाशी हसणारं
गवतपालवीत लपणारं
वेलवेलीवर झुलणारं
रानावनात मिरणारं
फुलबागेत शिरणारं
आकाशी मंद उडणारं
झाडास गिरक्या घालणारं
पानांस स्पर्श करणारं
फुलाफुलावर भिरभिरणारं
रंग उधळीत फिरणारं
पावसाच्या थेंबाशी लढणारं
श्रावण संपताच नाहीसं होणारं .................
© दिपक पाटील.
No comments:
Post a Comment