मी फक्त मनातल्या सत्य वाचनाला, तत्वाला,
हृदयाच्या खऱ्या स्पंदनाना कागदावर आरामात मांडतो,
कोण म्हणतं मी कविता करतो
माझ्या आणि तुमच्या भावनांचे ओझे मी एकटा वाहतो
आणि तुमच्यासमोर पुस्तकात काव्यरुपात जन्मतो,
मनाला उधाण होऊन आकाशी, रानोवनी, सागर किनारी भटकू देतो
आणि तिथलं सौंदर्य शब्दांसवे घेऊन येतो,
कोण म्हणतं मी कविता करतो
अबोल वाऱ्याचे, गंधफुलांचे,पावसाच्या सरींचे, चिमणपाखरांचे, सरत्या सांजेचे,
सुर्यास्ताचे माझ्या परीने कौतुक करतो,
मी प्रेमयुगुलांचा विश्वास जिंकून त्या दोन शरीरांचा
एक श्वास होण्याचा प्रयत्न करीत असतो,
कोण म्हणतं मी कविता करतो
मी कविता वैगेरे करीत नाही मी माझ्या आत्म्याला
तुमच्या आत्म्याशी एकरूप करीत असतो......................© दिपक
राजेन्द्र पाटील
No comments:
Post a Comment