Showing posts with label पाऊस. Show all posts
Showing posts with label पाऊस. Show all posts

Thursday, 3 May 2012

पहिल्या पावसा तुझी आठवण येते...




तुझे येणे हरवेळेस नित्यनवे असते
तुझ्याशिवाय जगणे कुणाचेच नसते,

तुझी एक सर मातीस सुगंध देते
तुझ्या सलग धारांनी नदी खळखळून वाहते,

तुझ्या आगमनाने चातकाची प्रतिक्षा सरते
फुलपालवी वेली झाडांसवे बहरते,

तु येता आकाश सप्तरंगी होते
त्यावेळी थोडी उन्हाचीही साथ असते,

तु येता चांदणं कुठेतरी लपुन बसते
नाहीतर जणू धरतीवर काजवा होऊन परतते,

तुझे आगमन प्रत्येकाला हवेच असते
पावसा बरसणा आम्हाला तुझी आठवण येते.

© दिपक पाटील.

Saturday, 17 March 2012

श्रावणातल्या आठवणींच एक पान...


पुस्तकात  दुमडुन  ठेवलय  आठवणींच एक पान
शब्द खुप सुंदर होते लिहलेले होते खुप छान,
शब्दांमध्ये होता गोड गुलाबी थंडीचा गारवा
खळखळत होते झरे बहरत होता निसर्ग हिरवा,
चिमण्यांची होती चिवचिव
कावळ्यांची कावकाव,
पोपट करत मिठूमिठू
नुकताच लागलेला होता श्रावण  ऋतू,
मोर  पिसारा फुलवून नाचत होता
कोकिळा मंजूळपणे गात होती,
चिखलात कमळ उमलत होते
कस्तुरी सुगंध दरवळत होता ,
वाऱ्याची मंद झुळूक मनाला छेडत होती
बरसणारे  मोती पापण्यांवर दाटत  होते ,
लहान मुलं कागदाच्या होड्या बनवत होती
मोठी मोटारगाड्या  फिरवत होती ,
शिवारात पिके डोलत होती
अगोदर तीही थेंबापायी आसुसली होती
कुणब्या खुश होता उसाला चांगला भाव होता ,
कोवळ्या उन्हाच्या सारी पडत होत्या
डोंगरच्या मध्यस्ती इंद्रधनु रंग उधळित होता ,
हे कोवळे उन चौफेरी पडत होते
आणि दुमडून ठेवलेले आठवानींचे पान सरत होते 

© दिपक रा.पाटील.