Monday 30 January 2017

आपण तिच्यासाठी काय केले...

इकडे हल्ले,तिकडे हल्ले
दहशतवाद्यांनी उडवले किल्ले
त्यातही सारे भारतीयच मेले
भारत माता की जय म्हणतो
मग आपण तिच्यासाठी काय केले

बलात्कार,स्त्रिभृणहत्त्या
प्लेगच्या साथीसारखे पसरवले
हेही सारे पसरवणारे भारत मातेचेच चेले
भारत माता की जय म्हणतो
मग आपण तिच्यासाठी काय केले

व्यसनांनाही नाही सीमा
अठराव्या वर्षीच लागतो विमा
व्यसनांत कित्येक अडकले,कित्येक मेले
भारत माता की जय म्हणतो
मग आपण तिच्यासाठी काय केले

जिथे तिथे भ्रष्टाचार करून
स्विस बॅंकेचेही अकाऊंट भरले
तरीही आपण भ्रष्ट नेत्यांनाच मतदान केले
भारत माता की जय म्हणतो
मग आपण तिच्यासाठी काय केले...

© दिपक रा. पाटील

Saturday 21 January 2017

मन मोकळं...

मन मोकळं होतं 
जेव्हा कुणाशी 
दोन शब्द 
बोलू वाटतात 
मन भरतं 
जेव्हा 
आपण बोललेले शब्द 
त्यांना पटतात.

© दिपक रा पाटील

Friday 20 January 2017

शब्द...

शब्द माझे सर्वकाही
शब्द माझी आई
शब्द माझे मित्र
शब्द माझे चरित्र

© दिपक रा पाटील

Thursday 19 January 2017

काही घोषवाक्य...

मराठी-
1.होऊ दया लेक,बघा भविष्ये अनेक
2.शिकलेली मुलगी,दोन्ही घरी सलगी
3.मुलीला सन्मान दया,मुलीला जीवनदान दया

हिन्दी-

1.जहाँ हैं बिटियाँ,वहाँ हैं खुशियाँ      
2.पढ़ी लिखी बेटी,धन कीँ  पेटी 
3.आज की बेटी,कल का भविष्य
4.बेटीयों का है जमाना,फिर क्यों नही उन्हें अपनाना
5.जिस घर लड़की, उस घर तरक्की
6.सच्ची बेटी,अच्छी बेटीं
7.बेटी अपनाओ,खुशियाँ अपनाओ

© दिपक रा. पाटील

होती हो...

लढती हो,  झगडती हो
तब भी दिल में होती हो

अकेले चलते है रास्तो पर
तब  तुम  मंजिल होती हो

अकेले अकेले गाते है हम
तब तुम महफिल होती हो

पर्बत  पर  चढने  जाते है
तब तुम झील मै होती हो

© दिपक रा पाटील

झील - झरा 

विधानसभेचा निकाल...

परवा विधानसभेचा निकाल होता
काहींचा अखेरचा तो काल होता

काहींचा चेहरा एकदम लाल होता
काहींच्या चेहऱ्यावर गुलाल होता

काहींच्या प्रतिष्ठेचा खरा प्रश्न होता
काहींच्या जिंदगीचा  सवाल  होता

काहींचा संपर्क  विशाल  होता
काहींचा  तिथेही  दलाल  होता

काहींच्या  गल्ल्यात  भरपूर  माल  होता
पठ्ठ्या निवडणुकीपूरती फक्त हमाल होता 

- दिपक रा पाटील.

काही शेर...

१.
लिखने लगा तो बोहोत लिखू।
जो जिया नहीं वो क्यों लिखू।।

२.
जमाना बदल गया बदल गये घरवाले |
जब पैसे आने लगे तब बोले लाले ||

३.
जगण्यासाठी माणसाकडे रक्कम हवी
नाहीतर जोडलेली माणसं तरी भक्कम हवी

© दिपक रा.पाटील.

सहा शब्दांच्या गोष्टी...


पाऊस आला ती नव्हती मीही कोरडाच.


झाडावर लटकलेला बियाणं पेरुण सडलेलं होतं.


एक सैनिक राजा झाला युद्ध संपले.

Wednesday 18 January 2017

नको मला...

नको मला प्रसिद्धि 
नको मला गादी
मला हवी लेखणी
ती पण साधी-सुधी 

नको मला गाडी
नको मला बंगला
मला बघायचाय समाज
सुधारतांना चांगला

नको मला पेढा 
नको मला लाडू
या पायी देवा
नको अनितीला धाडू

नको त्या पार्टया
त्यातल्या त्या कार्टया
उगीच नादाला लावतात
क्षणिक साल्या भुरट्या

नको त्या जाती
नको ते धर्म
हवे सत्याचे सर्व भक्त
शेवटी सार्यांचच लाल रक्त

नको मला सत्कार
नको मला पुरस्कार
त्याचे पैसे करून दया
ज्यांना नाही घर अन् दार

नको मला आभार
ना वर वर प्यार
मला हवा शिवाजी महाराजांचा दूवा
अल्प भोजन नित्य व्यावहार

© दिपक रा पाटील.

Tuesday 17 January 2017

आज ही सोबतीला...

जरी 'ती' नाही आज ही सोबतीला
अश्रू आटवावे अन् तिला आठवावे

© दिपक रा पाटील.

विरह...

मित्रा,
तू
हॉस्पिटल
मधल्या
बेडवर
आजाराने
तडपतोय
आणि
मी
अलिशान
बेडवर
विरहाने...


पिंपळाच्या पानावर
कविता लिहीली
पिंपळाचे पान सुकले
पण शाई सुकली नाही
कारण ती विरहाची होती...

© दिपक रा पाटील.

कोजागिरी...


कळी...

एकदा कळी  उमलतांना
बोलली  माझ्याशी
मला फुल होऊ दे
मग खेळ माझ्या भावनांशी

© दिपक रा.पाटील

फेसबूक स्टेटस...

१.निवडणूकीत ठराविक जनतेची मतं नाहीतर मनं विकत घेतली जातात.

२.आज भारतात राहिल्याचा खरा अभिमान वाटतोय.सर्व वर्गाच्या (category) लोकांसाठी नोटा बदलवण्यासाठी बँकेत एकच रांग.

३.विचार 'मर्सिडीज' च्या पातळीचे असले की मग सायकल वर फिरतांना ही स्वत:चा अभिमान वाटतो व कुठलाही कमीपणा वाटत नाही.

४.डि.जे.वाजतांना जेवढा त्रास होत नाही तेवढा थंडी वाजल्यावर होतो.

५.प्रत्यक्ष भेटल्यानंतरच्या संवादात जो आनंद आहे तो अप्रत्यक्ष संवादात नाही.
उदा. अप्रत्यक्ष  - फेसबुक ,whatsapp,sms

६.अभ्यास मनापासून केला तर यश मिळतं प्रेमाचही तसच असतं.

७.ती असली की दररोज दिवाळी वाटते ती नसली की दिवाळीत ही दिवाळी नाही.

८. मी मंदीरात जात नाही मला देण्याची सवय आहे.

९.जीवन म्हणजे सुखद अन् दुखद अनुभवाचं कलेक्शन.

१०.बुद्धिमान व्यक्तीला जात लागत नाही तो सर्व संकटांवर मात करतो.आपण सगळे एक आहोत. मनुष्य ही एकच जात आहे या पृथ्वीतलावर.

११.भ्रष्टाचाराने काही लोक श्रीमंत होत असतील पण राष्ट्र दारिद्र्य रेषेखाली जाते.

१२.दगडावर फुलं वाहून व दोन-चार मंत्र म्हणून पुजारी बक्कळ कमवतात आणि दुसरीकडे 200-400 रू .साठी छिन्नी -हातोड़े घेउन जाते बनविणारे गरीब बिचारे ,राबणारे

१३.काही उच्चशिक्षित व भरपूर पगार असणारे लोक अजुन जास्त हुंडा मागतात. कदाचित शिक्षण हे त्यांनी हुंडा मिळवण्यासाठी घेतले असावे.अशांना उच्चशिक्षित भिखारी म्हणन्यास काही हरकत नाही.

१४.भारत माझा देश आहे मारत माझा देश आहे...

१५.काही लोक दीड दिवसांचा गणपती घरी बसवतात आणि म्हणतात
"गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या"

© दिपक रा. पाटील

आई...

नसतेस  घरी तू आई
घर, घर वाटत नाही
असतेस घरी तू जेव्हा
घर स्वर्गाहून कमी नाही

© दिपक रा पाटील

भटकणे मनाचे...

भटकणे मनाचे संपावे एकदाचे
भाळणे कुणावरही संपावे एकदाचे

वाटे पुन्हा तिने परत यावे एकदाचे
मरतो किती आम्ही पहावे एकदाचे

गळे आमचे आता सुकले एकदाचे
सुर नको आम्हा तिने गावे एकदाचे

वाटे तिला पुन्हा पत्र पाठवावे एकदाचे
उत्तर नको आम्हा तिने आठवावे एकदाचे

© दिपक रा.पाटील

आठवणींच्या सरी...

तु घरी , मी घरी
आठवणींच्या सरी

चंद्र वेडा नभामधे
का न व्हावे मी तरी

सांज ही सरावी
एकदा तरी,एकदा तरी

© दिपक रा. पाटील

ढूँढते हैं...

आँखोंकि जरूरत ढूँढते हैं 
हम अच्छी सूरत  ढूँढते हैं

करोडो मंदिर बने यहाँ पें 
हम जिन्दा मूरत ढूँढते हैं

हजारों काम मिलते हैं हमें
हम इज्जत-शोहरत ढूँढते हैं

बच्चों जैसी हरकत करते हैं
हम खुदमें  शरारत ढूँढते हैं

तंग आगये दवाईयो सेे
हम जिनेको कुदरत ढूँढते हैं

दीदार हूआ दुनियाका हमें 
हम और कुछ हैरत ढूँढते हैं

© दिपक रा पाटील

तू असतांना, तू नसतांना

तू असतांना आभाळ भरगच्च भरतं
तू नसतांना तेच मग डोळ्यांतून वाहतं

तू असतांना सागरी उसळत्या लाटा 
तू नसतांना सारीकडेच मोकळ्या वाटा

तू असतांना चाफा चहूबाजूंनी फुललेला
तू नसतांना तोही फुलण्यास घाबरलेला

तू असतांना ऊन वारा पाऊस सारखाच
तू नसतांना दिवस रात्रींचा खेळही परकाच

तू असतांना असते दररोज दिवाळी
तू नसतांना नसते दिवाळीतही दिवाळी

तू असतांना प्रत्येक विषयात स्कोरींग
तू नसतांना प्रत्येक लेक्चर बोरींग

तू असतांना मी गातो सुरात गाणे
तू नसतांना त्याच सुरांचे बेसूर होणे

तू असतांना ग्रंथालय संपूर्ण भरलेलं
तू नसतांना पुस्तकाचं पानही न पलटलेलं

तू असतांना वाटते सायकल पण कार
तू नसतांना वाटते मर्सडीज पण बेकार

तू असतांना सगळं जग भारी भारी
तू नसतांना टपरीवर सारखी उधारी

तू असतांना मन कसं शांत शांत 
तू  नसतांना मग कवितेचा प्रांत

तू असतांना तूच माझं जग
तू नसतांना सारखी तगमग

तू असतांना वाटतं तुझ्याकडेच बघावं
तू नसतांना मग कुणासाठी जगावं

तू असतांना सुचत नाही काही
तू नसतांना सुचणं थांबत नाही

तू असतांना मी संपूर्ण तुझ्यात
तू नसतांना मी न उरतो माझ्यात

तू असतांना हृदयाची सारखी धडधड
तू नसतांना हृदय चालतय हेच मात्र भाग्य

© दिपक रा पाटील.