Showing posts with label प्रेरणा. Show all posts
Showing posts with label प्रेरणा. Show all posts

Wednesday, 8 February 2017

पुस्तकं असती पुस्तकं...

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकं घडवी मस्तकं
पुस्तकांतून वाहे ज्ञानझरा
पुस्तकांत सापडे उद्देश खरा

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकांत जिंकण्याची ओढं
पुस्तके उलगडती कोडं
पुस्तके जिंकवीती गडं

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकांत अवघे जग
पुस्तकं शिकवीती जगणे
जरा उघडून तर बघ

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तक कुणाचे जगणे
पुस्तक हाती पडता
सुधारले कुणाचे वागणे

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तक म्हणजे रहस्य
विनोदी,दुःखी लेखकाचं
अलगद रडवणारं हास्य

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकं शब्दांची भाषा
तलवारांपेक्षा धारधार
वचनांची त्यात नशा

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकं सारा आसमंत
न संपणारा हा सागर
अनुभूती देई अनंत

© दिपक रा पाटील

Wednesday, 18 January 2017

नको मला...

नको मला प्रसिद्धि 
नको मला गादी
मला हवी लेखणी
ती पण साधी-सुधी 

नको मला गाडी
नको मला बंगला
मला बघायचाय समाज
सुधारतांना चांगला

नको मला पेढा 
नको मला लाडू
या पायी देवा
नको अनितीला धाडू

नको त्या पार्टया
त्यातल्या त्या कार्टया
उगीच नादाला लावतात
क्षणिक साल्या भुरट्या

नको त्या जाती
नको ते धर्म
हवे सत्याचे सर्व भक्त
शेवटी सार्यांचच लाल रक्त

नको मला सत्कार
नको मला पुरस्कार
त्याचे पैसे करून दया
ज्यांना नाही घर अन् दार

नको मला आभार
ना वर वर प्यार
मला हवा शिवाजी महाराजांचा दूवा
अल्प भोजन नित्य व्यावहार

© दिपक रा पाटील.

Tuesday, 17 January 2017

आई...

नसतेस  घरी तू आई
घर, घर वाटत नाही
असतेस घरी तू जेव्हा
घर स्वर्गाहून कमी नाही

© दिपक रा पाटील