Tuesday 21 March 2017

अभिमान...

क्षणाक्षणात रंग बदलणारा सरडा
आज मात्र
रंग बदलण्यापुर्वीच
सापाच्या तावडीत सापडला
आणि कसाबसा संघर्ष करून
रक्तबंबाळ होऊन निसटलाही
इतर सरडे,
साप,
प्राणी व पक्षी
सगळ्यांनी त्याला बघितलं
मात्र सापाच्या तावडीत असतांनाचा
जन्म-मृत्युचा खेळ
त्याने
एकट्यानेच अनुभवलेला होता
त्यामूळेच
जीवंत सुटल्याचा 'अभिमान'
त्याला जाणवला
आता मात्र
तो
रंग न बदलता
वनात फिरतो
इतर प्राणीपक्ष्यांच्या तोंडून
स्वत:ची तावडीतून सुटल्याची स्तुती एेकत...

© दिपक रा. पाटील.

Monday 20 March 2017

अनर्थ...

एका कविने
निसर्ग,
देश,
प्रेम,
समाज,
मानवता,
तत्वज्ञान
अशा अनेक विषयांवर
कविता लिहिल्यात
एके दिवशी
एका सुंदर स्त्री समोर
त्याची कामवासना
जागृत झाली
अन्
अनर्थ झाला
'कविता '
व्यर्थ
गेल्यात.

© दिपक रा.पाटील