Saturday 28 April 2012

मला तुझी आठवण येते...


आजकाल समुद्र किनारा एकटाच गाठतो
त्या संथ लाटांचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकतो
नेहमी सारखे पाण्याचे थेंब गालावर येतात
नेमका थेंब पुसायला खिशात रुमाल नसतो
मग मला तुझी आठवण येते,

कडक उन्हाळ्याचे दिवस
त्यामुळे बाहेरची हवाही गरम
घराची खिडकी बंद करायला जातो
हळूच सूर्याची किरणे ओठांना स्पर्श करतात
त्या स्पर्शात 
मग मला तुझी आठवण येते,

संध्याकाळी सहज फिरायला जातो
भेळपुरी-पाणीपुरी खातो
आणि बिल देतेवेळी मात्र सुट्टे नसतात
मग मला तुझी आठवण येते,

पहाटे उठून थोडं फिरायला जातो
चालता चालता कधी अचानक पायाला ठेच लागते
नखातून रक्त निघायला लागतं
प्रचंड वेदना होतात
त्या प्रत्येक वेदनेत  
मग मला तुझी आठवण येते,

आजही नेहमीप्रमाणे खुप काही लिहून ठेवलय
त्यात प्रेमकवितांवर जास्त भर दिलाय
मग ज्यावेळी माझे लिखाण कुणी वाचत नाही
मग मला तुझी आठवण येते,

संध्याकाळच्या वेळी पतंग उडवत होतो
उडवता उडवता पतंग खुप उंच जाते
आणि एकदम नाहीसी होते
मग मला तुझी आठवण येते.

© दिपक पाटील.

Friday 6 April 2012

कधी कधी वाटतं...



कधी कधी वाटतं उंच उडवं आकाशात पाखरांसारख
ना कसली चिंता ना कसले दु:ख
एका उंच  झाडाला घरटे बांधून तिथेच रहावं
आयुष्यभर पिलांसोबत,
कधी कधी वाटतं पावसाचा थेंब व्हावं
श्रावणाखेरीज इतर मासातही बरसत रहावं
शिवारात पेरण्या झाल्यावर भरपुर पडावं
आणि गवताच्या पालवीआड लपून बसावं
दवबिंदुसारखं,
कधी कधी वाटतं आकाशातला तारा होवुन चमकत रहावं
ध्रुवतारा व सप्तर्षी सारखं मलाही एक नाव असावं
मीही कधीतरी तुटावं मला बघताच कुणीतरी इच्छा करावी
मनातल्या मनात,
कधी कधी वाटतं एक झाड व्हावं
माझी फळे खावून कोणाही सजीवाने आनंदुन जावं
थकलेल्या वाटसरुला निजवत राहवं माझ्या
मंद छायेत निवांत..................................................... © दिपक पाटील.