Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

Tuesday, 21 February 2017

दोन कविता...

१.
माझ्या कवितांमध्ये
अजुनही
तिची
सावली पडते
काय हवं असतं
अजून कविला...

२.
तिने
न वाचलेल्या
कविता तशाच आहेत
अजूनही पानावरची शाई
ओली आहे...

© दिपक रा पाटील

Friday, 17 February 2017

ओलावा...

ओठांनी
शिवलेल्या
वहीच्या
पानावरची
'कविता'
कोरडी
कशी
होऊ
शकते.

© दिपक रा पाटील

Tuesday, 17 January 2017

भटकणे मनाचे...

भटकणे मनाचे संपावे एकदाचे
भाळणे कुणावरही संपावे एकदाचे

वाटे पुन्हा तिने परत यावे एकदाचे
मरतो किती आम्ही पहावे एकदाचे

गळे आमचे आता सुकले एकदाचे
सुर नको आम्हा तिने गावे एकदाचे

वाटे तिला पुन्हा पत्र पाठवावे एकदाचे
उत्तर नको आम्हा तिने आठवावे एकदाचे

© दिपक रा.पाटील

आठवणींच्या सरी...

तु घरी , मी घरी
आठवणींच्या सरी

चंद्र वेडा नभामधे
का न व्हावे मी तरी

सांज ही सरावी
एकदा तरी,एकदा तरी

© दिपक रा. पाटील

Saturday, 28 April 2012

मला तुझी आठवण येते...


आजकाल समुद्र किनारा एकटाच गाठतो
त्या संथ लाटांचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकतो
नेहमी सारखे पाण्याचे थेंब गालावर येतात
नेमका थेंब पुसायला खिशात रुमाल नसतो
मग मला तुझी आठवण येते,

कडक उन्हाळ्याचे दिवस
त्यामुळे बाहेरची हवाही गरम
घराची खिडकी बंद करायला जातो
हळूच सूर्याची किरणे ओठांना स्पर्श करतात
त्या स्पर्शात 
मग मला तुझी आठवण येते,

संध्याकाळी सहज फिरायला जातो
भेळपुरी-पाणीपुरी खातो
आणि बिल देतेवेळी मात्र सुट्टे नसतात
मग मला तुझी आठवण येते,

पहाटे उठून थोडं फिरायला जातो
चालता चालता कधी अचानक पायाला ठेच लागते
नखातून रक्त निघायला लागतं
प्रचंड वेदना होतात
त्या प्रत्येक वेदनेत  
मग मला तुझी आठवण येते,

आजही नेहमीप्रमाणे खुप काही लिहून ठेवलय
त्यात प्रेमकवितांवर जास्त भर दिलाय
मग ज्यावेळी माझे लिखाण कुणी वाचत नाही
मग मला तुझी आठवण येते,

संध्याकाळच्या वेळी पतंग उडवत होतो
उडवता उडवता पतंग खुप उंच जाते
आणि एकदम नाहीसी होते
मग मला तुझी आठवण येते.

© दिपक पाटील.