Wednesday, 21 November 2018

काव्यभृणहत्या ...

नेहमीप्रमाणे
रात्री
स्वप्नात
कवितेच्या
दोन ओळी
सुचल्या होत्या
सकाळी लिहू म्हटलं.
उठल्यानंतर
आठवल्याचं नाही
खूप वाईट वाटलं त्याचं
पुन्हा एकदा
माझ्याकडून
काव्यभृणहत्या झाली...

©  दिपक पाटील.


जग प्लास्टिक प्लास्टिक होतंय...

प्लास्टिकच्या बाटलीत प्लास्टिकचं पाणी
कशी येतील मुखातून मग गोड गोड गाणी
प्लास्टिकच नाक मग होईल मनही प्लास्टिकचं
घरातल्या कुंडीतलं पानही प्लास्टिकचं
प्लास्टिकचा भस्मासुर पोखरतोय समाजमन
संवेदना सोडून होतंय प्लास्टिकचचं सार तन
प्लास्टिकचा वापर म्हणजे पर्यावरणाचा ह्रास
अरे माणूस सोडा मुक्या प्राण्यालाही त्रास
प्लास्टिकला घाला आळा, प्लास्टिकचा वापर टाळा
पर्यावरणाबरोबर सामाजिक स्वास्थ्यही सांभाळा
प्लास्टिकचं फुल तिलाही नको असतं
प्लास्टिकच्या फुलाद्वारे प्रेम होतं नसतं
पुर्वी कुठं होतं प्लास्टिक
तरी माणसं होती ठिक
आता आलं प्लास्टिक
तरी शिकलेली मागतात भिक
जग प्लास्टिक प्लास्टिक होतंय
मन प्लास्टिकचं होऊ देऊ नका...!!!

© दिपक पाटील.


Thursday, 15 November 2018

पुस्तकं असती पुस्तकं...

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकं घडवी मस्तकं
पुस्तकांतून वाहे ज्ञानझरा
पुस्तकांत सापडे उद्देश खरा

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकांत जिंकण्याची ओढं
पुस्तके उलगडती कोडं
पुस्तके जिंकवीती गड

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकांत अवघे जग
पुस्तकं शिकवीती जगणे
जरा उघडून तर बघ

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तक कुणाचे जगणे
पुस्तक हाती पडता
सुधारले कुणाचे वागणे

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तक म्हणजे रहस्य
विनोदी,दुःखी लेखकाचं
अलगद रडवणारं हास्य

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकं शब्दांची भाषा
तलवारांपेक्षा धारधार
वचनांची त्यात नशा

पुस्तकं असती पुस्तकं
पुस्तकं सारा आसमंत
न संपणारा हा सागर
अनुभूती देई अनंत

© दिपक रा पाटील.

Thursday, 1 November 2018

एक भारत, श्रेष्ठ भारत , सदा रहे हमेशा...

मोदीजी स्वप्नात येऊन म्हणाले...

मेरे जिन्दगी का आखरी पन्ना
लिखने की ये तमन्ना
तरंग जैसी उठ रही है दिल में
शायर जैसी महफिल में
इन सरसराती पत्तीयो पर
लिखने लगा हूं नया संदेसा
एक भारत, श्रेष्ठ भारत , सदा रहे हमेशा...
जिन्दगी के इस मुकाम पर
सोच रहा हूं ठहरकर
भारत को सर्वश्रेष्ठ बनाऊंगा
झेंडा ऊंचा लहराकर
उम्मीदो के ये मौसम
आते हैं लेकर खुशीया और गम
उन्ही मौसम में भिगकर
भारत को सर्वश्रेष्ठ बनाऊंगा
झेंडा ऊंचा लहराकर
मन में उठते है सन्नाटे
रास्तोमें चुभते हैं काटे
उन्ही रास्तो पर चलकर
भारत को सर्वश्रेष्ठ बनाऊंगा
झेंडा ऊंचा लहराकर....

© दिपक राजेंद्र पाटील

Tuesday, 23 October 2018

कोजागिरी...

मंद  मंद   या   चांदराती
शुभ्र् चांदण्या झगमगती
दिशा दिशा  लखलखूणी
दुधात  साऱ्या अवतरती

केशर    सांगे   रंगसंगती
साखर  सांगे मधूर किती
कोजागिरीच्या  या  राती
सुखामेवाच्या हजार जाती

© दिपक रा.पाटील.



Monday, 22 October 2018

ही रीत दुनियेची...

मनाच्या आत आत
मनाला मन खातं
सरावी ही रात
ओळखीची,
तरी मी भीत भीत
संग संगीत
जगतो ही रीत
दुनियेची...
© दिपक पाटील.

चंद यादें...

यादों के साये
सांज को आये
युहीं गुनगुनाये
होठों पर

चांद में चेहरा
दिखे हमे तेरा
हमारा ही पेहरा
सर आँखो पर

© दिपक पाटील.

Sunday, 3 June 2018

किंमत...

पहिल्या
पावसाचा
थेंब
तिच्या
गालावर
पडला
अन्
मोत्याची
किंमत
कमी
झाली.

© दिपक पा.

Monday, 19 February 2018

निरर्थक...

तो कवी काय कामाचा जो तुमची प्रत्यक्ष समस्या सोडवायला मदत करू शकत नसेल आणि नुसता कवितेतून व्यक्त होत असेल.

© दिपक

लाभ...

तुझ्या
कवितेतून
जर
एका
सजीवालाही
फायदा
झाला.
मित्रा...
तु कवी झालास.

© दिपक
#Implementation_of_poetry

Friday, 9 February 2018

युवारंग गीत...

युवारंग हा ,प्रारंभ हा
कलेचा, शुभारंभ हा                      || धृ ||

एक रंग एक संघ एक भावना
होऊ दंग संग संग हिच प्रेरणा
अंतरी या जागवू नवी चेतना
मिळू दे कलेतुनी नवी संवेदना          || १ ||

देऊ हर्ष आनंद माय रसिकजनांना
जोडुया कलेतुनी सृजनमने मनांना
तृप्त होऊ गीत गाऊ चला पुन्हा पुन्हा  
मिळू दे नवा सुर मिळो नवी वेदना    || २ ||

संस्कृती आपुली होऊ तिचे ऋणी
ताल नृत्य वाद्य काव्य शब्दांतुनी
एक होऊनी ध्वनी मुखी एक गर्जना
शब्दांना सुर मिळो हीच कामना       || ३ ||

मराठी ही आपुली तिच माय बाप
फेडू तिचे पांग तिचे ऋण अमाप
सज्जनांस देऊ कीर्ती,देऊ चालना
जिंकण्यास बळ मिळो क्षणाक्षणा       || ४ ||          


© दिपक पाटील.              

Friday, 2 February 2018

उम्मीद...

हमने फिरसे कपास लगायी
इसबार आखरी सांस लगायी

बारिश की बूँद रास ना आयी
हमने जमींपर प्यास लगायी.

( म्हणजे विहीर खोदली)

© दिपक पाटील.

Wednesday, 31 January 2018

समज...

व्यक्ती डोळ्यातलं पाणी आटवायला,
अपमान पचवायला,
प्रत्यक्ष कृतीतून बोलायला,
उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघायला
आणि
चेहर्यावरचे भाव लपवायला शिकली
मग ती माणूस होत आहे असं समजावं...

© दिपक पाटील

Tuesday, 30 January 2018

स्फुरण...

शब्द  पेरला  मातीत
माती धरली  मुठीत
मुठीमधल्या मातीत
काव्य स्फुरले प्रितीत

© दिपक पाटील.

Monday, 29 January 2018

चिंतन-मनन

भरपूर वाचल्याने कधीच अक्कल येत नसते.वाचल्या गेलेल्या गोष्टीवर चिंतन-मनन झाल्यावर/केल्यावर खरी अक्कल येते.

© दिपक पाटील.

प्रवास...

जीवनाचा प्रवास श्वास संपेपर्यंत थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. प्रवास चालूच असतो;

© दिपक पाटील

हक्क...

अभ्यासापेक्षा स्वतः वर वेळ  आल्यावर 'संविधान' व 'मानवाधिकार'जास्त कळायला लागतात.

© दिपक पाटील.

Sunday, 28 January 2018

निशब्द...

शब्द उरले अर्थापूरती
अन्
जग उरलं स्वार्थापूरती


© दिपक पाटील

जीवनाचा प्रवास...

जीवनाचा प्रवास श्वास संपेपर्यंत थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. प्रवास चालूच असतो;

© दिपक पाटील