Monday 11 December 2017

रंगमंच...

जीवनाच्या रंगमंचावर
बालपण प्रत्येकाचं येऊन जातं
खेळण्यात,कुदण्यात जमीनीवरच
भरार्या घेत हरवून जातं
ना कसली चिंता
ना कसले भास
बालपणी असतो
मनमोकळा श्वास
कालांतराने रंगमंच बदलतो
अन् स्पर्धेच्या युगात पदार्पण होतं
मग मोठी पुस्तकं,मोठा अभ्यास
रात्रंदिवस यांचाच सहवास
इतकं करुनही नोकरी मिळेलच
याची खात्री नाही
मिळाली तर आनंदच
मग पुन्हा रंगमंच बदलतो
आपण एकाचे दोन होतो
पुढल्या काही वर्षातच
आपल्याच मुलांचा रंगमंच
आपण डोळ्यांसमोर बघतो
.
.
.
असाच प्रवास करत आयुष्याच्या अंताला येऊन पोहोचतो
मग शेवटचा श्वास सुटतो
शेवटच्या रंगमंचावर
आयुष्यातील केलेल्या कामगिरीप्रमाणे
गर्दी असते प्रेक्षकांची
सादरकर्ता नसतांनाही...

© दिपक पाटील

No comments: