Saturday, 28 April 2012

मला तुझी आठवण येते...


आजकाल समुद्र किनारा एकटाच गाठतो
त्या संथ लाटांचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकतो
नेहमी सारखे पाण्याचे थेंब गालावर येतात
नेमका थेंब पुसायला खिशात रुमाल नसतो
मग मला तुझी आठवण येते,

कडक उन्हाळ्याचे दिवस
त्यामुळे बाहेरची हवाही गरम
घराची खिडकी बंद करायला जातो
हळूच सूर्याची किरणे ओठांना स्पर्श करतात
त्या स्पर्शात 
मग मला तुझी आठवण येते,

संध्याकाळी सहज फिरायला जातो
भेळपुरी-पाणीपुरी खातो
आणि बिल देतेवेळी मात्र सुट्टे नसतात
मग मला तुझी आठवण येते,

पहाटे उठून थोडं फिरायला जातो
चालता चालता कधी अचानक पायाला ठेच लागते
नखातून रक्त निघायला लागतं
प्रचंड वेदना होतात
त्या प्रत्येक वेदनेत  
मग मला तुझी आठवण येते,

आजही नेहमीप्रमाणे खुप काही लिहून ठेवलय
त्यात प्रेमकवितांवर जास्त भर दिलाय
मग ज्यावेळी माझे लिखाण कुणी वाचत नाही
मग मला तुझी आठवण येते,

संध्याकाळच्या वेळी पतंग उडवत होतो
उडवता उडवता पतंग खुप उंच जाते
आणि एकदम नाहीसी होते
मग मला तुझी आठवण येते.

© दिपक पाटील.

Friday, 6 April 2012

कधी कधी वाटतं...



कधी कधी वाटतं उंच उडवं आकाशात पाखरांसारख
ना कसली चिंता ना कसले दु:ख
एका उंच  झाडाला घरटे बांधून तिथेच रहावं
आयुष्यभर पिलांसोबत,
कधी कधी वाटतं पावसाचा थेंब व्हावं
श्रावणाखेरीज इतर मासातही बरसत रहावं
शिवारात पेरण्या झाल्यावर भरपुर पडावं
आणि गवताच्या पालवीआड लपून बसावं
दवबिंदुसारखं,
कधी कधी वाटतं आकाशातला तारा होवुन चमकत रहावं
ध्रुवतारा व सप्तर्षी सारखं मलाही एक नाव असावं
मीही कधीतरी तुटावं मला बघताच कुणीतरी इच्छा करावी
मनातल्या मनात,
कधी कधी वाटतं एक झाड व्हावं
माझी फळे खावून कोणाही सजीवाने आनंदुन जावं
थकलेल्या वाटसरुला निजवत राहवं माझ्या
मंद छायेत निवांत..................................................... © दिपक पाटील.

Saturday, 17 March 2012

श्रावणातल्या आठवणींच एक पान...


पुस्तकात  दुमडुन  ठेवलय  आठवणींच एक पान
शब्द खुप सुंदर होते लिहलेले होते खुप छान,
शब्दांमध्ये होता गोड गुलाबी थंडीचा गारवा
खळखळत होते झरे बहरत होता निसर्ग हिरवा,
चिमण्यांची होती चिवचिव
कावळ्यांची कावकाव,
पोपट करत मिठूमिठू
नुकताच लागलेला होता श्रावण  ऋतू,
मोर  पिसारा फुलवून नाचत होता
कोकिळा मंजूळपणे गात होती,
चिखलात कमळ उमलत होते
कस्तुरी सुगंध दरवळत होता ,
वाऱ्याची मंद झुळूक मनाला छेडत होती
बरसणारे  मोती पापण्यांवर दाटत  होते ,
लहान मुलं कागदाच्या होड्या बनवत होती
मोठी मोटारगाड्या  फिरवत होती ,
शिवारात पिके डोलत होती
अगोदर तीही थेंबापायी आसुसली होती
कुणब्या खुश होता उसाला चांगला भाव होता ,
कोवळ्या उन्हाच्या सारी पडत होत्या
डोंगरच्या मध्यस्ती इंद्रधनु रंग उधळित होता ,
हे कोवळे उन चौफेरी पडत होते
आणि दुमडून ठेवलेले आठवानींचे पान सरत होते 

© दिपक रा.पाटील.






Sunday, 4 March 2012

कोण म्हणतं मी कविता करतो?...


कोण म्हणतं मी कविता करतो
मी फक्त मनातल्या सत्य वाचनाला, तत्वाला,
हृदयाच्या खऱ्या स्पंदनाना कागदावर आरामात मांडतो,

कोण म्हणतं मी कविता करतो
माझ्या आणि तुमच्या भावनांचे ओझे मी एकटा वाहतो
आणि तुमच्यासमोर पुस्तकात काव्यरुपात जन्मतो,

कोण म्हणतं मी कविता करतो 
मनाला उधाण होऊन आकाशी,रानोवनी, सागर किनारी भटकू देतो
आणि तिथलं सौंदर्य शब्दांसवे घेऊन येतो,

कोण म्हणतं मी कविता करतो
अबोल वाऱ्याचे,गंधफुलांचे,पावसाच्या सरींचे,चिमणपाखरांचे,सरत्या सांजेचे,
सुर्यास्ताचेमाझ्या परीने कौतुक करतो,

कोण म्हणतं मी कविता करतो
मी प्रेमयुगुलांचा विश्वास जिंकून त्या दोन शरीरांचा
एक श्वास होण्याचा प्रयत्न करीत असतो,  
  
कोण म्हणतं मी कविता करतो
मी कविता वैगेरे करीत नाही मी माझ्या आत्म्याला
तुमच्या आत्म्याशी एकरूप करीत असतो......................© दिपक राजेन्द्र पाटील

Friday, 20 January 2012

फुलपाखरू...




डालीडालीवर बसणारं 
पानाफुलाशी हसणारं
गवतपालवीत लपणारं
वेलवेलीवर झुलणारं
रानावनात मिरणारं
फुलबागेत शिरणारं
आकाशी मंद उडणारं
झाडास गिरक्या घालणारं
पानांस स्पर्श करणारं
फुलाफुलावर भिरभिरणारं
रंग उधळीत फिरणारं
पावसाच्या थेंबाशी लढणारं
श्रावण संपताच नाहीसं होणारं ................. © दिपक पाटील.