पहिल्या
पावसाचा
थेंब
तिच्या
गालावर
पडला
अन्
मोत्याची
किंमत
कमी
झाली.
© दिपक पा.
भरत आली वही सरत आली शाई माझ्या मनातल्या भावनांना मात्र अंत नाही. © दिपक पाटील.
तो कवी काय कामाचा जो तुमची प्रत्यक्ष समस्या सोडवायला मदत करू शकत नसेल आणि नुसता कवितेतून व्यक्त होत असेल.
© दिपक
तुझ्या
कवितेतून
जर
एका
सजीवालाही
फायदा
झाला.
मित्रा...
तु कवी झालास.
© दिपक
#Implementation_of_poetry
व्यक्ती डोळ्यातलं पाणी आटवायला,
अपमान पचवायला,
प्रत्यक्ष कृतीतून बोलायला,
उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघायला
आणि
चेहर्यावरचे भाव लपवायला शिकली
मग ती माणूस होत आहे असं समजावं...
© दिपक पाटील
भरपूर वाचल्याने कधीच अक्कल येत नसते.वाचल्या गेलेल्या गोष्टीवर चिंतन-मनन झाल्यावर/केल्यावर खरी अक्कल येते.
© दिपक पाटील.
जीवनाचा प्रवास श्वास संपेपर्यंत थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. प्रवास चालूच असतो;
© दिपक पाटील
अभ्यासापेक्षा स्वतः वर वेळ आल्यावर 'संविधान' व 'मानवाधिकार'जास्त कळायला लागतात.
© दिपक पाटील.
दिसला रानात काळा पक्षी
अंगावरती पांढरी नक्षी
त्याचे डोळे टपोरे गोल
जाड पापण्या भुवया खोल
दिसलं रानात काळं फुल
लागली कुतूहलाची चाहूल
बघितले नव्हते कधी असे
जणू मज ते एकमेव भासे
दिसला रानात काळा साप
अंगी भरला भितीची ताप
घेतली जाड काठी हाती
हाणली त्याच्या कमरेवरती
दिसली रानात काळी माशी
क्षणभर वाटली जणू मधमाशी
बसली हाती पण चावली नाही
तेव्हा कळलं ती मधमाशी नाही
© दिपक पाटील
जीवनाच्या रंगमंचावर
बालपण प्रत्येकाचं येऊन जातं
खेळण्यात,कुदण्यात जमीनीवरच
भरार्या घेत हरवून जातं
ना कसली चिंता
ना कसले भास
बालपणी असतो
मनमोकळा श्वास
कालांतराने रंगमंच बदलतो
अन् स्पर्धेच्या युगात पदार्पण होतं
मग मोठी पुस्तकं,मोठा अभ्यास
रात्रंदिवस यांचाच सहवास
इतकं करुनही नोकरी मिळेलच
याची खात्री नाही
मिळाली तर आनंदच
मग पुन्हा रंगमंच बदलतो
आपण एकाचे दोन होतो
पुढल्या काही वर्षातच
आपल्याच मुलांचा रंगमंच
आपण डोळ्यांसमोर बघतो
.
.
.
असाच प्रवास करत आयुष्याच्या अंताला येऊन पोहोचतो
मग शेवटचा श्वास सुटतो
शेवटच्या रंगमंचावर
आयुष्यातील केलेल्या कामगिरीप्रमाणे
गर्दी असते प्रेक्षकांची
सादरकर्ता नसतांनाही...
© दिपक पाटील
ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला मोठा
माणूस झाला खोटा
ये गं ये गं सरी
माझे मडके भरी
पैसा आला धावून
माणूसकी गेली वाहून
ये रे ये रे ढगा
मऊ तुझा फुगा
शहरात तर नाहीच नाही
तुझा गावाकडे पण दगा
ये रे ये रे थेंबा
कसा पिकेल आंबा
शहरातल्या धुराड्यानं
तुलाही केलाय लंबा
या गं या गं धारा
फुलवा मोर पिसारा
गोठ्यातल्या गुराढोरांना
कुठून मिळेल मग चारा
ये रे ये रे घना
नको देऊ यातना
बसलाय राजा पेरणी करून
आख्या शिवारात दाणा
ये गं ये गं लहर
तुझ्याशिवाय नाही बहर
असं हे धुराटलेलं
गुदमरलेलं शहर
© दिपक रा पाटील.
ग्रीष्म लोपला
मेघ दाटले
बरसल्या श्रावणसरी,
चांदणं निजले
तिमीर अवतरले
भरली गोदावरी,
टिपूर टपटप
येई सपासप
अंगणी घरोघरी,
अवखळ वारा
खळखळ झरा
फुटती बांध तिरी,
अवती भवती
मेघ स्पर्शती
दिसे पर्वत शिरी,
सप्त रंग
निळाई संग
शोभती अंबरी.
© दिपक रा पाटील.
एकदा पावसाकडे नद्या,नाले,तलाव,विहिर,डबके,धरण आणि समुद्राने
आपल्या आकाराप्रमाणे आरक्षण मागितले...काही वेळानंतर माझा गरीब शेतकरी म्हणाला,"काही यांच्यामधून थोडं उरलं असल तर माझ्या शेतातही पड थोडावेळ"
© दिपक रा. पाटील.
क्षणाक्षणात रंग बदलणारा सरडा
आज मात्र
रंग बदलण्यापुर्वीच
सापाच्या तावडीत सापडला
आणि कसाबसा संघर्ष करून
रक्तबंबाळ होऊन निसटलाही
इतर सरडे,
साप,
प्राणी व पक्षी
सगळ्यांनी त्याला बघितलं
मात्र सापाच्या तावडीत असतांनाचा
जन्म-मृत्युचा खेळ
त्याने
एकट्यानेच अनुभवलेला होता
त्यामूळेच
जीवंत सुटल्याचा 'अभिमान'
त्याला जाणवला
आता मात्र
तो
रंग न बदलता
वनात फिरतो
इतर प्राणीपक्ष्यांच्या तोंडून
स्वत:ची तावडीतून सुटल्याची स्तुती एेकत...
© दिपक रा. पाटील.
एका कविने
निसर्ग,
देश,
प्रेम,
समाज,
मानवता,
तत्वज्ञान
अशा अनेक विषयांवर
कविता लिहिल्यात
एके दिवशी
एका सुंदर स्त्री समोर
त्याची कामवासना
जागृत झाली
अन्
अनर्थ झाला
'कविता '
व्यर्थ
गेल्यात.
© दिपक रा.पाटील